Sunday 22 February 2009

भाग २ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !

भाग १ वरुन पुढे सुरु ...

तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.


अभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.



'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'





पुन्हा तिकडून पाण्याकड़े गेलो आणि आमचा लेट लंच उरकला. खायला काय होत ह्याचे डिटेल्स एकडे नको नाही का. कस असत की बरेच जणांना ते वाचूनच भूक लागते. आता ४:३० वाजून गेले होते आणि अंधार व्हायच्या आत आम्हाला किमान खाली गाडयांपर्यंत पोचयचे होते. पुन्हा सुसाट निघालो ते कुठेही न थांबता उतरायला सुरवात केली. माचीवर पोचलो आणि तिकडून खाली ठाकुरवाडीला. दिवसभर सुरु असलेली अमृताची फोटोग्राफी सुरूच होती. मावळत्या सुर्याचे काही मस्त फोटो तिने टिपले. खाली गाडयांपर्यंत पोचलो तोपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. त्यात कोणीतरी गाड़ीचा स्पार्कप्लग काढून टाकला होता. नशीब तो नीट लागला आणि गाड़ी सुरु झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. हा माझा ह्या सुट्टीमधला शेवटचा ट्रेक होता. बरेच दिवसांपासून डोक्यात असलेला एक ट्रेक एकदम मस्तपैकी पार पडला होता.


कलावंतीण सुळक्याच्या कोरीव पायऱ्या आणि खिंडीमध्ये पायथ्याला असलेली गुहा हे ह्या ट्रेकचे मुळ उदिष्ट होते. नेहमी खातो त्याप्रमाणे मी आणि ऐश्वर्याने फारसे खाल्ले पण नाही. तरीपण हा ट्रेक माझ्या बेस्ट ट्रेक्स पैकी झाला. पुढच्या महिन्यात करायचे ट्रेक्सचे प्लान बनवत बनवत परतीच्या वाटेला लागलो.

8 comments:

  1. छान भ्रमंतीतला थरार अनुभवला

    ReplyDelete
  2. सही रे..! वाचुनच भटकंतीचा अनुभव घेतला... माझाही प्लॅन आहे.. मे महिन्यात प्रबळगडला जायचा... बघु... कसे जमतेय ते.. :)

    ReplyDelete
  3. may mahinyat gelas tar pratyeki kamit kami 4 ltr pani gheun ja ... :)

    ReplyDelete
  4. कलावंतीणचा सुळका चढ्ण्यासाठी थोडासा धोकादायक आहे,हे खरे आहे का?

    ReplyDelete
  5. i dont think so .. may be in rains to some extents ...

    ReplyDelete
  6. Choudhari laai bhaari lihila aahe tumhi aamhi tar ekdam fan jalo boova tumchya blogche

    ReplyDelete
  7. सचिन, अरे पावसात खूप रिस्की आहे. सगळ्या पायऱ्या शेवाललेल्या असतात आणि त्यात तुफानी वारा भर घालतो. एक चूक आणि खल्लासच..!!!

    ReplyDelete
  8. सही रे.. त्या पाया-यांचा फोटो कसला सुंदर आहे. खुपच छान..

    ReplyDelete