Wednesday, 18 February 2009

डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !सह्याद्री नामा नग हा प्रचंड ... हा दक्षिणेचा अभिमान दंड ... !
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या ... हाती झळाळे परशू तयाच्या ... !कोकणातील सर्वात उंच पर्वत ... आजा / आजोबा डोंगर ... !!!


मी भ्रमंती का सुरू केली माहीत नाही आणि का ते कधी शोधायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २००० मध्ये कॉलेजला असताना सुरू झालेल हे वेड आता अगदी टोकाला जाउन पोचल आहे. गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण हे माझे आवडते छंद. मला माझ्या कामातून सलग खूप सुट्टी मिळते. मग त्या सुट्टीमध्ये भटकणे हा माझा छंद. अर्थात सोबत फोटोग्रॉफी म्हणजेच छायाचित्रण आणि ग्रामजीवन जवळून बघणे हे त्यासोबतचे छंद. अर्थात तेथे सुद्धा मी माझा खाण्याचा छंद सांभाळतो. हा.. हा.. आता माझ्या बरोबर असे अनेक वेडे आहेत हे काही सांगायची गरज नाही. २००० मध्ये सुरू झालेली ही भटकंती आज २००९ मध्ये सुद्धा तितक्याच जोमाने सुरू आहे. कॉलेज संपल्यावर मध्ये थोडा ब्रेक लागला होता. पण आला पुन्हा सूटलोय. 'सूटलोय म्हणजे फुल्ल टू सूटलोय.' घरून शिव्या खातोय सध्या आणि काही मित्रा - मैत्रीनींच्या सुद्धा.

ह्या ९ वर्षात अनेक अनुभव आले. चांगले-वाईट. गावा गावातून विविध स्वभावाची लोक भेटली . खूप काही शिकलो. खूप काही घेतल. काही देता आल आहे का माहीत नाही. म्हणतात ना ' निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे ' पूर्णपणे पटले ह्या ९ वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला. आज हे सगळ तुम्हाला सांगायच आहे. आवडल तर घ्या नाहीतर डोंगरवेडा म्हणून सोडून द्या.

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी... वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे... हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े... डोंगर किल्ले बुरुज कड़े... !

लवकरच येतो आहे ... काही मजेशीर आणि जबरदस्त किस्से घेऊन ... !!!


*******************************************************************************

5 comments:

 1. Hi Rohan

  sahi idea ahe tuzi.......

  Best of Luck.

  ReplyDelete
 2. Hiiiii!!!!!!!!!!

  Zakkkkassssssssssss

  Tuzi Live commentary ch evadhi mast asate..

  Aata sagale experience ekatrach milatil

  Kishyanchya Khazinyachi vat pahtey...

  ReplyDelete
 3. I came across your blog on treks in Marathi and I fell in love with your lucid style of writing. Keep it up!
  Mangesh Nabar

  ReplyDelete
 4. हुरूप वाढवण्यासाठी खुप-खुप आभार.. अपेक्षा आहे की माझे लिखाण आवडते आहे तुम्हाला ... !!!

  ReplyDelete