Wednesday 1 June 2011

सर्प ...


पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे...


१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...

 २. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना

रच्याकने ...तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे  त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... :)


 
४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?
५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.
६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.
७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.
 ८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!! १०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!११. पिवळा नाग... १२. मण्यार (Indian Commom cret) - 
१३. पिवळी धामण - बिन विषारी.
रच्याकने ... तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??