१७ जुलै रोजी जो ट्रेक विसापूर येथे जाणार आहे त्याला 'मराठी ब्लॉगर्स ट्रेक' असे जरी म्हटले आहे तरी त्याचा अर्थ हा 'मराठी ब्लॉगर्सचा मेळावा' वगैरे नव्हे. ४-६ मराठी ब्लॉगर्स कुठेही कुठल्याही कार्यक्रमासाठी एकत्र आले तर त्याला उगाच मेळावा म्हणणे उचित ठरणार नाही. ट्रेकला जाणारे मात्र सर्व मराठी ब्लॉगर्स असल्याने त्याला मराठी ब्लॉगर्स ट्रेक असे संबोधले आहे. हा पूर्णपणे वैयक्तिक कार्यक्रम असून पुणे आणि मुंबई ब्लॉगर्स मीट प्रमाणे होणारा हा अधिकृत कार्यक्रम नव्हे हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो.
ट्रेकसाठी नोंदणी २५ जून रोजी बंद होणार असून यादीमध्ये आत्तापर्यंत १४ उत्साही भटक्यांची नावे समाविष्ट आहेत. प्रत्येक सभासदाला कसे, कुठे आणि कधी भेटायचे, सोबत काय-काय सामान आणायचे ह्याबद्दल एक सविस्तर मेल २७ जून नंतर पाठवला जाईल. ज्या सभासदांना कुठल्याही प्रकारच्या काहीही शंका असतील त्यांनी नि:संकोचपणे आम्हाला संपर्क करावा...