Tuesday 5 January 2010

सह्यभ्रमंती ... 'सांगाती सह्याद्रीचा'च्या साथीने ... !

बघता बघता २००९ चे वर्ष सरले. फेब. पासून जोमाने ह्या ब्लॉगवर लिखाण सुरू केल्यानंतर गेल्या ३ महिन्यात काहीच लिखाण केलेले नाही. कामातून वेळ मिळाला की 'लडाख'वर लिखाण करण्यात इतका व्यस्त असायचो की बाकी सर्व लिखाण बाजूला पडले होते. शिवाय ३-४ महिन्यात कुठे ट्रेकला सुद्धा जाणे झालेले नाही. तेंव्हा आता लिहायचे काय असा प्रश्न पडला होता.

पण दिवाळीच्या दरम्यान गौरी - सुमेधा ह्या माझ्या डोंगरातल्या जुन्या मैत्रिणींनी मला भेट म्हणुन 'सांगाती सह्याद्रीचा' हे पूस्तक पाठवले आणि आपल्या अगदी जुन्या भटकंती वर लिही असे सुचवले. दोघींनी माझ्यासाठी एक मस्त मेसेज सुद्धा लिहिला होता त्यात.

एका डोळस आणि सजग अशा सह्याद्रीच्या सांगातीस सप्रेम भेट                                                   ... गौरी - सुमेधा.


खुप मस्त वाटले आणि २००१-०४ मध्ये केलेल्या काही ट्रेक्सवर लिखाण करायचे असे मी ठरवून टाकले. आमचे किस्से आणि सर्व आठवणी तर लक्ष्यात आहेतच पण आता पुस्तकातील लिखाण वाचून रूट सुद्धा बराच लक्ष्यात येत आहे.

तेंव्हा आता पुढचे काही महिने लिखाण कळसूबाई - हरिश्चंद्रगड़, चांदवड-धोडोप, कार्ला - भाजे - लोहगड - विसापूर, औंधा - पट्टा अश्या जुन्या भटकंतीवर करणार आहे. नक्कीच आवडेल तुम्हाला... :)

6 comments:

  1. मराठी पाऊल पडते पुढे... येऊ दे मित्रा... वाटच पाहत आहे.

    ReplyDelete
  2. रोहन मला तुझा आणि पंकजचा विलक्षण हेवा वाटतो.....सह्याद्रीचा चिरा नी चिरा अप्रतीम सुंदर आहे आणि तुम्ही त्याच्या सानिध्यात असता....आम्ही आपले पुचाटपणा करत कितीही ईच्छा झाली तरी कुठेही जात नाही...
    तेव्हा लिही पटापट निदान वाचू तरी दे आम्हाला.....

    ReplyDelete
  3. तन्वी ह्या पंकजचा जास्त हेवा वाटला पाहिजे :D ... माझा 'फ्लो' सध्या तुटला आहे आणि मी जुन्या आठवणी जागवतोय ... आता बहुदा अजून २ - ३ महीने तरी भटकंती नाही ... :(

    ReplyDelete
  4. किसने मेरा नाम लिया यहा? और क्यू लिया?

    असे काही नाहीये तन्वी... आम्ही आपले नवजात भटके आणि रोहन म्हणजे veterans मधला एक. शिवाय तो सिंदबाद आहे :-)

    बाय द वे... ते ’सांगाती सह्याद्रीचा’ पुस्तक मला पण हवंय राव... कधी योग येईल काय माहीत.

    ReplyDelete
  5. नवजात भटके ... वा ... एका वर्षात ९० ठिकाणी जाउन आलेले हे बघा नवजात भटके :P चायला.. राजे आहात तुम्ही. आम्ही कसले 'वेटेरन'. जमतय आपल कसतरी ... :)

    ReplyDelete
  6. मीही असंच कुणीतरी "सांगाती सह्याद्रीचा" गिफ्ट देण्याची वाट पाहतोय.

    ReplyDelete