Saturday 29 May 2010

मान्सून ब्लोगर्स ट्रेक ... !

मान्सून ब्लोगर्स ट्रेक... कशी वाटली कल्पना??? ट्रेक किंवा हाईक जरा काही जणांना कठीण वाटत असेल तर आपण 'मान्सून आउटिंग' असा सोपा शब्द वापरुया. पण मुळ कल्पना अशी आहे की सर्व ब्लोगर्स पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात एकत्र यावेत. या आधीचे पुणे आणि मुंबई येथील दोन्ही मेळावे यशस्वी झाल्यानंतर आता येत्या पावसाळ्यामध्ये एकदा सर्वजण एखाद्या डोंगरावर, किल्ल्यात किंवा तत्सम जागी भेटले तर काय धमाल येईल ना!!!



सगळ्या ब्लॉगर मंडळीना एक दिवस पुण्याच्या-मुंबईच्या बाहेर एकत्र करता येईल का?? असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला गेला होता. दोन्ही मेळावे नक्की करताना सुद्धा ते लोणावळा येथे का करू नये असे देखील एक मत काही जणांचे पडले होते. तेंव्हाच मी, पंकज आणि दिपकने ठरवले होते की पुढची ब्लोगर मीट करायची ते डोंगरात. शिवाय दोन्ही वेळेला यायला न जमलेल्या अनेकांना या निमित्ताने यायला मिळेल हा देखील हेतू आहेच. गेल्या आठवडयामध्ये त्या संधर्भात आमचे बोलणे झाले आणि किमान रूपरेषा नक्की केली. सर्वांना जमेल - झेपेल अशी जागा आणि तारीख नक्की करणे हे मुख्य उद्दिष्ट होते.

शनिवार, दिनांक १७ जुलै २०१० रोजी लोणावळाच्या आसपास असणाऱ्या 'किल्ले विसापूर' किंवा पवना धरणाच्या काठाशी असणाऱ्या 'किल्ले तिकोना' येथे एक दिवसाचा छानसा ब्लोगर ट्रेक आखता येईल अशी सध्या कल्पना आहे.

तारखे आणि ट्रेकच्या जागेसंधर्भात कोणाच्याही काहीही सुचना असल्यास येत्या १५ जूनपर्यंत मला chaudhari.rohan@gmail.com, पंकजला pankajzarekar@gmail.com किंवा दिपकला dipak.shinde@gmail.com संपर्क करावा किंवा येथे प्रतिक्रया द्यावी... ही विनंती... !


ब्लोगर्स ट्रेकसाठी नाव नोंदणी १६ जून ते ३० जून ह्या दिवसामध्ये होईल. ट्रेकचे नियम आणि इतर अधिक माहिती लवकरच पोस्ट केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
.
.
आपले डोंगर यात्री ... डोंगर वेडे ... भैसट्लेला पंकज, भुंगा दीपक आणि पक्का भटक्या रोहन ...

16 comments:

  1. वा वा.. मनःपूर्वक शुभेच्छा !!! आणि त्रिवार निषेध.. !!!

    या पहा निषेधाच्या पुणेरी पाट्या

    *ब्लॉगर विश्वात फक्त खादाडीचाच निषेध होतो असे कोणी समजू नये*

    किंवा

    *आमचे येथे भटकंतीचाही निषेध करून मिळेल*

    ReplyDelete
  2. हेरंब + १०००......
    विसापूर आणि तिकोना दोन्हीपैकी कुठलंही चाललं असतं...लोहगडला गेले होते तेव्हा विसापूर डोक्यात होतं पण आम्ही पक्के ट्रेकर नाही त्यामुळे तेवढा स्टॅमिना नव्हता....जा...मजा करा....नि............षे...............ध......................

    ReplyDelete
  3. हेरंबा मी जाणार.... :)
    (वाकोल्या दाखवायची स्मायली आहे का रे कोणाकडे????)

    असो... रोहणा नासिक म्हणाला होतास ना, मग गाडी लोणावळ्याला का रे बा वळवलीस??

    ReplyDelete
  4. रोहन... एकदम जबरी कल्पना. ब्लॉगर्स मेळ्याव्यात माईक, भाषणं, स्टेज वगैरे टाळुन सगळेच ’ब्लॉगर्स जमीं पर’ ही कल्पनाच धमाल आहे.
    रोहन, पंकज आणि दिपक तुम्हा तिघांचही अभिनंदन आणि शुभेच्छा!!

    ReplyDelete
  5. Rohan dada, beezzee hotas ka gele kahi diwas...??? Neways...Mi nakki yenaar... :)

    ReplyDelete
  6. चालेल, कुठेही.

    ReplyDelete
  7. रोहन, किती रे दुष्टपणा कराल तुम्ही.... हेरंब, पाहतो आहेस नं? त्रिवार,दहावार... निषेध...निषेध...निषेध!

    ReplyDelete
  8. मला विचारूच नकोस...



    मी असेनच :-))))))))))

    ReplyDelete
  9. वा मंडळी बेत छान आहे.. मला नक्की तारीख सांगा म्हणजे आगाऊ सुट्टी आरक्षित करून ठेवतो.. नाहीतर ऐनवेळी माझा मनेजर बोम्बलेल...:-)

    आपला बझ्झकर,
    भारत मुंबईकर

    ReplyDelete
  10. वा... कालच एका ट्रेकला जाऊन आलो. आता इथेही येईन. विसापूर किंवा लोहगड सोयीचा पडेल. अथवा अन्या काही आहे का डोक्यात?

    ReplyDelete
  11. विसापूर विसापूर विसापूर!

    तिकोन्याला मधले अंतर गाडि वेळेवर मिळाली नाहि तर त्रासदायक ठरेल. नपेक्षा विसापुर केव्हाहि जास्त तप्यातला आहे.

    ReplyDelete
  12. उत्तम कल्पना ! मी पण येणार !

    ReplyDelete
  13. अपुनबी आ रेला है....

    ReplyDelete