Monday 12 April 2010

मराठी ब्लॉगर्स मेळावा ... !

नमस्कार मंडळी.. कसे आहात??? मला ठावूक आहे एव्हाना ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली आहे तरी सुद्धा लिहितो आहे. कांचन आणि महेंद्रदादा यांनी सविस्तरपणे मराठी ब्लॉगर्स, स्नेह मेळावा - मुंबई याबद्दल आधी लिहिले आहेच. फेब्रुवारी पासून डोक्यात असलेला हा विषय अखेर मार्गी लागतोय हे बघून आनंद होतोय. या शिवाय ब्लॉग्गिंग विश्वामधील तुम्ही सर्व या निमित्ताने भेटणार ह्याचा देखील आनंद आहेच.

तुम्हाला माहिती आहेच की... ९ मे रोजी होणाऱ्या मेळाव्याच्या नाव नोंदणीची मुदत वाढवून आता ४ मे २०१० अशी करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी आत्तापर्यंत ८० हून अधिक जणांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि आकडा वाढत चालला आहे... :) जसजसा आकडा वाढतोय तस-तसा हुरूप आणि आनंद देखील वाढत चालला आहे. मेळाव्यासाठी नियोजित केलेल्या स्थळाचे नाव ’दादर सार्वजनिक वाचनालय’ (दा.सा.वा.) असे आहे. येथे कसे पोचायचे यासाठी येथे टिचकी मारा. मेळाव्याच्या स्थळी पोचण्यात काहीही अडचण असल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा. तुम्ही नाव नोंदणी केलेली असेल तर मला मेल करून माझा वैयक्तिक भ्रमणध्वनी मागवू शकता.

मेळाव्याचा मूळ उद्देश सर्व मराठी ब्लॉगर्स आणि वाचक यांची भेट व्हावी तसेच त्यांनी एकमेकांच्या ब्लोगबद्दल आचार - विचार यांचे आदान - प्रदान करावे असा आहे. याशिवाय फक्त वाचक असलेल्या अनेकांना विविध विषयावरील मराठी ब्लोग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा देखील आहे. ब्लॉगर्सच्या मनातील काही कळीचे मुद्दे येथे चर्चेला घेतले जाऊ शकतात. कार्यक्रमाची रूपरेषा येत्या आठवडयामध्ये निश्चित होते आहे तेंव्हा आपल्या सूचना किंवा मते आम्हाला पुढच्या १ आठवडयाच्या आत नक्की पाठवा. ह्या मेळाव्यामधून आपणा सर्वांना नेमके काय अपेक्षित आहे हे सुद्धा समजेल.

अंतिम रूपरेषा नाव नोंदणी केलेल्या सर्वांना दिनांक १ मे रोजी मेल करून पाठवली जाईल याची नोंद घ्यावी.
आपले ब्लॉगर मित्र ...

महेंद्र कुलकर्णी - kbmahendra@gmail.com

कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com

आणि

रोहन चौधरी - chaudhari.rohan@gmail.com

9 comments:

 1. अरे वा! ८० च्या वर नाव नोंदणी, सॉलिड धमाल येइल या मेळाव्याला.
  सोनाली केळकर

  ReplyDelete
 2. oh even i want to start my blog, but i dont know if i will be consistantly writting.

  ReplyDelete
 3. रोहणा, आपण सेंचुरी मारणार बघ !!

  ReplyDelete
 4. तुझ्या, कांचनच्या आणि महेंद्रजींच्या मेहनतीपायी साकारणार्‍या या मेळाव्यास अनेक शुभेच्छा...

  ReplyDelete
 5. नाव नोंदणी तर दणक्यातच झाली आहे. शिवाय ज्या प्रकारे ईमेल्स येतात त्यावरूनही या ब्लॉगर्स मेळाव्याची उत्सुकता ब्लॉगर्स आणि वाचकांच्याही मनात किती दाटून आली आहे, हे समजतं. एक ब्लॉगर म्हणून मला हा मेळाव्यामधे काय काय होईल याचं कुतुहल लागून राहिलं आहे तर आयोजकांपैकी एक म्हणून मला या मेळव्यामधे ब्लॉगर्ससाठी काय काय चांगलं करता येईल, यावर विचार करतेय. जसजसा दिवस जवळ येतोय, तसतसा आनंद वाढत चालला आहे. या मेळाव्याला माझ्याकडून दणदणीत शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. दणाक्यात होवुन जावुदे.

  ReplyDelete
 7. १०० चा आकडा पार झालेला आहे ... :) ते सुद्धा विशेष काहीही न करता ... :)

  ReplyDelete