Wednesday 23 June 2010

ट्रेक विसापूर - कसे, कुठे आणि कधी भेटायचे ...

१७ जुलै रोजी जो ट्रेक विसापूर येथे जाणार आहे त्याला 'मराठी ब्लॉगर्स ट्रेक' असे जरी म्हटले आहे तरी त्याचा अर्थ हा 'मराठी ब्लॉगर्सचा मेळावा' वगैरे नव्हे. ४-६ मराठी ब्लॉगर्स कुठेही कुठल्याही कार्यक्रमासाठी एकत्र आले तर त्याला उगाच मेळावा म्हणणे उचित ठरणार नाही. ट्रेकला जाणारे मात्र सर्व मराठी ब्लॉगर्स असल्याने त्याला मराठी ब्लॉगर्स ट्रेक असे संबोधले आहे. हा पूर्णपणे वैयक्तिक कार्यक्रम असून पुणे आणि मुंबई ब्लॉगर्स मीट प्रमाणे होणारा हा अधिकृत कार्यक्रम नव्हे हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो.


ट्रेकसाठी नोंदणी २५ जून रोजी बंद होणार असून यादीमध्ये आत्तापर्यंत १४ उत्साही भटक्यांची नावे समाविष्ट आहेत. प्रत्येक सभासदाला कसे, कुठे आणि कधी भेटायचे, सोबत काय-काय सामान आणायचे ह्याबद्दल एक सविस्तर मेल २७ जून नंतर पाठवला जाईल. ज्या सभासदांना कुठल्याही प्रकारच्या काहीही शंका असतील त्यांनी नि:संकोचपणे आम्हाला संपर्क करावा...


आपले डोंगर यात्री ... डोंगर वेडे ...

भैसट्लेला पंकज, भुंगा दीपक आणि पक्का भटक्या रोहन ... !

8 comments:

  1. रोहन शुभेच्छा....

    ४-६ मराठी ब्लॉगर्स कुठेही कुठल्याही कार्यक्रमासाठी एकत्र आले तर त्याला उगाच मेळावा म्हणणे उचित ठरणार नाही.....+१

    ReplyDelete
  2. लवकर पाठव रे डीटेलातला मेल...

    ReplyDelete
  3. Where i have to register ?? any link??/

    ReplyDelete
  4. नमस्कार रोहनजी,
    काही कौटुंबिक कारणांमुळे मला नाही जमणार यायला,
    खरं तर मीच हट्ट धरला आणि मीच येत नाहीए खूप वाईट वाटतय,
    पण माझं सध्या इथे असणं खूप गरजेचं आहे,
    माफी करा खाबूराजे,
    जपून प्रवास करा, तब्येतीची काळजी घ्या,
    अतिउत्साही, अतिसाहसी आणि नवख्या ट्रेकर्सकडे विशेष लक्ष असू द्या,
    हॅपी जर्नी :)

    ReplyDelete
  5. ट्रेक साठी नाव नोंदणी कशी करायची कोणी सांगेल का...........?

    ReplyDelete
  6. To register for trek... please refer 1st blog post of June 2010. there is a form to fill in for the trek.

    ReplyDelete
  7. आपण विसागडाच्या कोणत्या वाटेने वरच्या आंगाला गेला?

    ReplyDelete
  8. राधेय.. लोहगडापासून विसापूरकडे जाताना मध्ये एक पाण्याची वाट वरती जाते. सध्या तीच वाट गडावर जाण्यासाठी अधिक प्रचलित आहे. विसापूरचा (इसागड) राजमार्ग पलीकडून म्हणजे 'देवरे' वरून आहे. पण वरची वाट बरीच खराब असते, विशेषत: पावसाळ्यात. आम्ही पाण्याची वाट घेऊन ४० मिनिटात गडाच्या माथ्यावर पोचलेलो होतो.

    ReplyDelete