Sunday, 2 August 2009

भाग १ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

ऑगस्ट २००० मध्ये मुंब विद्यापिठाच्या 'हायकिंग आणि ट्रेकिंग क्लब'तर्फे 'आजा उर्फ़ आजोबा पर्वत' येथे ट्रेकसाठी गेलो होतो. हा माझा पहिलाच ट्रेक. डोंगरांशी माझी पाहिली भेट. पावसाळ्यामधले ते सह्याद्रीचे नितांत सुदर असे रूप माझ्या मधला 'डोंगरयात्री' जागा करून गेले. त्यानंतर मात्र पुन्हा आजोबा पर्वत येथे जाणे झालेच नाही. अनेक ठिकाणी फिरलो वर्षात पण इतक्या जवळ असून सुद्धा 'आजा' करायचा राहिलाच.
अखेर ह्यावर्षी मार्च महिन्यात जायचेच असे ठरवले. सोबतीला ऐश्वर्या, विवेक, सचिन आणि निता असे भिडू जमवले आणि नेहमीप्रमाणे बाइक्स दामटवल्या. आजा / आजोबाला जायचे तर मुंबईहून थेट नाशिक महामार्ग पकडायचा. शहापुर फाटयाला उजवीकड़े आत शिरले की 'डेणा' गावचा रस्ता पकडायचा. मध्येच उजव्या बाजूने एक रस्ता येउन मिळतो. हा रस्ता पुण्यावरुन येणाऱ्या भटक्यांसाठी उत्तम. पुण्याहून निघाले की खंडाळामार्गे खोपोलीहून चौक फाटयाला उजवीकड़े वळून कर्जत - कल्याण - मुरबाड मार्गे ह्या रस्त्याने डेणा गावापर्यंत पोचता येते. मी, निता, सचिन आणि विवेक ठाण्याहून नाशिक हायवेने निघालो खरे पण रस्ता बदलून कल्याणमध्ये घुसलो, कारण ऐश्वर्याला उचलायचे होते. मग तसेच पुढे मुरबाडकड़े निघालो. हा रस्ता बाइक चालवायला माझा अतिशय आवडता. मुरबाडला पोचलो नाश्ता उरकला आणि पुढे निघालो. साधारण १०:३० च्या आसपास डेणाला पोचलो. गावात दुकाने आहेत आणि होटेल्स सुद्धा. जे काही खादु-पिदू करायचे ते एकडेच. कारण एकदा गाव सोडले की पुढे काही नाही. आम्ही सोबत सगळे आणले असल्याने थांबायचा काही प्रश्न नव्हता. गावामध्ये शिरल्या-शिरल्या लगेच उजवी मारायची आणि मग थोड पुढे जाउन डाव्या हाताला आजोबाला जायचा रस्ता आहे.
क्रमश: .....

2 comments:

  1. ब्लोगरला काय झालय काही कळत नाही... जास्त लिहायचा किंवा फोटो टाकायचा प्रयत्न केला की अपलोड होतच नाही आहे ... :( म्हणुन आता हे असे लहान लहान भाग टाकतोय...

    ReplyDelete
  2. अरे ही पोस्ट आत्ता नजरेस पडलीये. पुढचीही वाचते आहेच.:)

    ReplyDelete