Sunday 17 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !

कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़ अश्या एकुण ५ दिवसाच्या माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच मेगा ट्रेकवरची पहिली पोस्ट वाचल्यानंतर पंकजने मला प्रश्न केला. ''बालवाडीमध्ये असतानाच हायस्कूलचा ट्रेक केलास?" ह्याचे उत्तर देखील त्याच्याकडेच होते. आपल्या इतिहासावर - भूगोलावर प्रेम वगैरे सर्व मान्य. पण 'खाज' हे अगदी खरे-खुरे उत्तर. इथला कुठलाही अस्सल ट्रेकर, पक्का भटक्या ह्या सह्याद्रीमध्ये कसा तावून सुलाखून निघलेला असतो. पण त्यासाठी अर्थात तपश्चर्या देखील तितकीच महत्वाची. खाज जितकी जुनी तितका ट्रेक्कर अस्सल, पक्का भटक्या...


गेल्या ५ दिवसात आम्ही तेच काहीसे अनुभवत आलो होतो. एकीकडे सभोवतालचा निसर्ग मुक्तहस्ताने त्याचे ज्ञान वाटत होता. 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या ५ दिवसात. दुसरीकडे काका सलग ५ दिवस नित्यनियमाने आमची 'डोंगरातली शाळा' घेत होता. गरज पडेल तेंव्हा 'बरोबर मारत' सुद्धा होता. त्यात कुठेही खंड पडला नव्हता. ह्या पहिल्याच ट्रेकमध्ये सह्याद्रीच्या आकंठ प्रेमात बुडालोच नाही तर त्याच्या विविध रुपांनी भारावून देखील गेलो. अक्षरश: वेड लागते म्हणतात ना ते काय असते ते ह्या ट्रेकमध्ये अनुभवायला मिळाले. काय काय नाही अनुभवले... 'कळसुबाई' सारख्या शिखरावरची ती वजनी चढ़ाई, रतनवाडीला जाताना केलेला भंडारदरा जलाशयातला प्रवास, कात्राबाईच्या जंगलातली ती रात्र, हरिश्चंद्रगडाची अंधारी चढ़ाई असे एक ना अनेक चाबूक अनुभव ते ही पहिल्याच ट्रेकमध्ये... अर्थात पुढे सुद्धा अनेक भारी अनुभव आले पण ते पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास आला तो ह्या पहिल्या ट्रेकमध्ये. हा ट्रेक काहीतरी नवीनच देऊन गेला मला. मनातली उर्मी जागवून गेला. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला पाडून गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे 'कुठल्याही आव्हानावर मात करण्याची ईर्षा' प्रेरित करून गेला. 'जगण्याचा एक वेगळाच अर्थ' बहुदा मला लक्ष्यात आला. ह्या ट्रेकमध्ये पाहिलेले एक-एक दृश्य, जगलेला एक-एक क्षण अजून सुद्धा ताजा आहे मनात. जणू काही अगदी काल-परवाचीच गोष्ट आहे. १० वर्षे होउन गेली तरी त्या सर्व घटना सर्रकन डोळ्यासमोरून सरकून जातात. इथल्या रौद्रसौंदर्यात रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे. एकदा का तुम्ही यात शिरलात की हे व्यसन सूटणे कठीण किंबहुना अशक्य. आणि सोडावे तरी का? हा नाद खुळा एक नंबरी आहे. खरच...

"मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही."

हे तत्व मी पहिल्याच ट्रेकमध्ये शिकलो. ह्याचे पूर्ण श्रेय 'काका जोशी'ला सुद्धा जातेच. हा एक अवलिया आम्हाला बरोबर भेटला. त्याने आम्हाला 'डोंगरातले तत्वज्ञान' अतिशय कमी वेळात शिकवले. आता असे झाले आहे की सुट्टीवर तिकडे आल्यानंतर कुठे ट्रेकला गेलो नाही की जीव अस्वस्थ होतो. सह्याद्री आपल्याला बोलावतोय आणि आपण जात नाही म्हणजे काय? मी फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. तो मला बोलावतो तेंव्हा मी सहज त्याच्याकडे खेचला जातो.

आज मी जो काही आहे तो ह्या 'सह्याद्री'मुळे याचे पूर्ण भान मला आहे. त्यानेच तर घडवला आहे हा ... सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
.
.

11 comments:

  1. "चाबूक अनुभव" परफेक्ट शब्द आहेत मित्रा.

    खूप छान सीरिज होती पोस्ट्सची. तुला बरेच छळले मी पुढच्या पोस्ट्स साठी ना... असो या असल्या पोस्ट्स म्हटल्या की राहवतच नाही ना... सह्याद्री आपल्याला बोलावतोय आणि आपण जात नाही म्हणजे काय? मी फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. तो मला बोलावतो तेंव्हा मी सहज त्याच्याकडे खेचला जातो. आज मी जो काही आहे तो ह्या 'सह्याद्री'मुळे याचे पूर्ण भान मला आहे. त्यानेच तर घडवला आहे हा ... सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !


    असाच भटकत राहा...
    तुझ्यासारखाच डोंगरशाळेतला मित्र... आणि एक आगळे "रसायन"
    सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
    पंकज.

    ReplyDelete
  2. फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.

    ReplyDelete
  3. हा मला छळणारा डोंगरशाळेतला मित्र भेटणार कधी रे??? :D

    ReplyDelete
  4. धन्यवाद कल्पना ... तुम्ही आवर्जुन लिहिले. असे कोणी लिहिले की लिहायचा उत्साह देखील वाढतो ... :)

    ReplyDelete
  5. भेटणार भेटणार. लवकरच भेटणार.

    ReplyDelete
  6. मस्त झाला ट्रेक....मजा आली सगळं वाचायला...

    ReplyDelete
  7. धन्यवाद अपर्णा आणि हरे कृष्णाजी ... :)

    ReplyDelete
  8. ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"

    अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

    खरच रे रोहन, सह्ययात्रा - मनाला वेड लावणारी, ताप कटकटी पासून मुक्त, आयुष्याचे धडे देणारी... अतिशयोक्ती करत नाही. माझ्या आयुष्याचे धडे मी डोंगरातच गिरवले आहेत. ग्रॅजुयेशन पर्यंतच्या १५ वर्षात जे शिकलो नाही ते या एका ट्रेकने शिकवले.
    ट्रेक च्या आधीचा अभिजीत आणि ट्रेक नंतरचा अभिजीत यात जमीन असमानाचा फरक आहे. ज्या आत्मविश्वासाने आज मी काम करतो तो आत्मविश्वास या ट्रेकनेच आलेला आहे. नेतृत्व तर अगदी अंगात भिनले. जगण्याला खरा अर्थ मिळाला. योग्य आयोजनाचे महत्व पुरे पूर पटले.
    नवीन सवंगडी मिळाले. जुने सवंगडी अजुन घट्ट झाले. राजेश तर आमचा राजदा ( राजेश दादा ) बनला. मी आणि रोहन... डोंगर वेडे झालो. शेफाली, मनाली, सुमेधा, कविता, हर्षद, प्रशांत, कवीश याना गिर्यारोहनाची गोडी लागली. आशिष, प्रवीण, राहुल, सुरेश तर आज उत्करूष्ट रॉक क्लाइंबर आहेत.
    निसर्गाशी बंधिलकी, आपुलकी इथूनच निर्माण झाली. सह्याद्रीची ओळख झाली. नकळत महाराजांशी जवळीक साधता आली. या गड किल्ल्याना पाहून दुर्दम्य इच्छा शक्ति मिळाली. इतिहास फक्त पुस्तकात न रहता आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला.
    काकाने जे काही फंडे तिथे शिकवले आहेत ते पदोपदी उपयोगी पडत आहेत. मी तर म्हणेन मॅनेज्मेंटचा एखादा कोर्स करण्यापेक्षा काका बरोबर ट्रेकला जावे. हा हा... काय रोहन? आजही ते मुंबई यूनिवर्सिटी मधून हे काम अविरत करत आहेत. काकाचे आभार मानीत नाही. कारण आपल्यांचे कसले आभार??? पण तरीदेखील "आइ ओ अ लॉट टू धिस मॅन"
    बर्‍याच मोहिमा झाल्या कळसुबाई नंतर... अगदी लेह लडाख देखील. पण या ट्रेकची मजा काही औरच होती. अवीट अशी. एवरग्रीन.

    ReplyDelete
  9. aapla blog pahilyanda vaachla. mehi aaplya sarkhach ek "GIRISHISHYA". Blog barech vachto, majhe vadil VIVEK TAVATE he hi blog lihitat. Amhi doghehi sahyadrichya dongar kaparitun bhataknarech."saaransh" vachtana je kahi manat hote tech koni tari bhaashet utravlyasarkhe vaatle.haa ek kharokharach "nasha" ahe.tumchi hi bramhanti vachtana me swatah ti ghari basun anubhavli.to anubhav karun dilyabaddal dhanyvaad.

    ReplyDelete
  10. Hi Rohan,

    Khara tar Mi tumhala Olkhat nahi. Pan Tumhi lihileli Kalsubai te Harishchandra Gada paryantacha Amhi na anubhavlela Treak kharach eak pranna anni romanchak anubhav mulvun deto. amhi sahyadrichya 2 4 malelya killyanvarun phirun yeto anni sukh manto pan tumhi sahyadricha kushit shirun anubhavnare sukh kharach khoop ahe. Mazya tumhala ananta shubhechha

    ReplyDelete