Tuesday, 15 June 2010

कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा कार्यक्रम ...

पावसाळा सुरू झाला की जसे ट्रेकर्सना गड-किल्ल्यांचे वेध लागतात तसेच वेध लागतात ते आपला सह्याद्री, आपली वनसृष्टी जपण्याचे सुद्धा... असेक एक दुर्गयात्री म्हणजे 'मुकुंद गोंधळेकर काका'.. गेली कित्येक वर्षे ते राजमाची येथे आपले कार्य अव्याहतपणे पार पडत आहेत... यंदा त्यांनी कोंदिवडे - राजमाची या ट्रेक रूटवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठरवलेला आहे. आलेला निरोप जसाच्यातसा इथे देत आहे... ज्यांना ह्या पवित्रकार्यात भाग घ्यायचा असेल त्यांनी काकांना त्वरित संपर्क करावा...

आता पावसाचे आगमन झाले आहे. वृक्ष वाढावे यासाठी झाडांच्या बिया जमिनीत रुजत घालण्यासाठी योग्य मुहुर्त (हंगाम) आहे हा. कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा कार्यक्रम दिनांक १९, २० जून २०१० रोजी (शनिवार, रविवार) ठरविला आहे. कार्य सिध्दीस नेण्यास वनदेवता समर्थ आहे.


या मंगल कार्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार, मित्र मैत्रिणींसह आपण अवश्य यावे.
या मंगल कार्यात आहेर म्हणून झाडांच्या चांगल्या दर्जाच्या बिया (आंबा, जांभूळ, करंज, चिंच, बोर, वगरे) तसेच पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी न गळणारी जुनी भांडी (डबे, बाटल्या, बरण्या, वगैरे) आनंदाने स्वीकारली जातील.


या मंगल कार्यानंतरच्या स्नेहभोजनासाठी आपल्या आवडीचे व इतरांनाही आवडतील असे रुचकर खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी बरोबर आणण्यास विसरू नये.


या मंगल कार्याबाबत अधिक माहितीसाठी व आपण येणार आहात हे कळविण्यासाठी भ्रमण ध्वनी : - अमोघ घैसास
09819561606.
--
Mukund Gondhalekar

2A / 301, Kailash Park
Plot No.80, Nityanand Marg,
Panvel 410206
India
Tel. No. (22) 27469351 / 92235 79685 / 92117 68348

3 comments:

  1. अरे हे गोंधळेकर काका ग्रेट आहेत. त्यांच्या स्वयंपाकाची चव अजूनही जिभेवर आहे.

    ReplyDelete
  2. khupac chan kam karat ahaet kaka amhala pan aavdenl tumchaya barobar yayala......

    ReplyDelete