Friday 27 May 2011

ऐतिहासिक भटकंती ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...


तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.

पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.



१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.



 २. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.



 ३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर



४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.



 ५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.

 


 ६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू
 


 ७. वढू येथे काढलेली रांगोळी -



 आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.

८. देहू येथील तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर -



९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.



 १०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -
 


 ११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.



 इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.
 

१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.



 १३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.



 १४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.
 


 १५. महादजी शिंदे यांचा वीरासनातील पुतळा -



 १६. पुतळा आणि विजयस्तंभ
 


१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.
 


समाप्त...

8 comments:

  1. संभाजीमहाराजांची समाधी, तुळापूर, संगमेश्वर, त्रिवेणी संगम वगैरेंचे फोटो बघून संभाजीमहाराजांच्या तेजस्वी बलिदानाच्या आठवणीने रोमांच उभं राहिलं !! त्या धर्मवीर महामानवाला मानाचा मुजरा !!

    ReplyDelete
  2. काय बोलू रे रोहना या पोस्टबद्दल.... महाराजांची समाधी पहाताना खूप यातना होतात रे....

    तू त्या जागेला भेट दिलीयेस ... सगळ्यांनीच जायला हवेय आयूष्यात निदान एकदा तरी!!!

    ReplyDelete
  3. ४-५ वर्षापूर्वी गेलो होतो. छान शाांत जागा वाटली. त्यानंतर संभाजी वाचले - विश्वास पाटील यांचे तेव्हा परत सगळे आठवले आणि आज तुमचे फोटो पाहून छान वाटले. किल्ल्याची माहिती छान.
    त्या मानाने कमी लोक इथे जातात.

    ReplyDelete
  4. ते फोटोमध्ये दाखवले आहेस ते तुकाराम महाराज मंदिर नसून नविन बांधलेले गाथा मंदिर आहे.
    बाकी फोटो सुंदर आहेत. माझे दोन तुळापूरचे फोटो.
    http://www.flickr.com/photos/pankajz/3569432956/
    http://www.flickr.com/photos/pankajz/3565812952/

    ReplyDelete
  5. पंकज... धन्यवाद. बदल केला आहे.

    ReplyDelete
  6. सेनापती ,फोटो बघतांना वाचलेले, अंगावर काटा आणणारे, अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले .... :(
    एकदा तरी जायला हवच ह्या ठिकाणी.

    ReplyDelete
  7. khu sssss pach changale photo ahet. kolhapur la yenyache manat asel tar maza blog bagha
    http://kolhapurdarshan.blogspot.com

    ReplyDelete
  8. खरेच, एकदा तरी जायलाच हवे..

    ReplyDelete