लोहगडवाडी मधून दिसणारा विसापूर ...
१०:३० वाजून गेले होते तेंव्हा अजून १ मिनिट सुद्धा न दवडता विसापूरच्या मार्गाला लागलो. आमच्या सोबत अजून २ जण सोबत आले. २ कुत्रे. प्रत्येक ट्रेकला सोबत एक तरी कुत्रा असतोच. १५-२० मिनिटात मोठ्या लालमातीच्या मळलेल्या वाटेने विसापूरच्या चढणीच्या वाटेला लागलो. आता इथे चहाचे दुकान झाले आहे. शिवाय रस्त्यावर सर्व ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत.. आधी मात्र असे नव्हते. विसापूरला डाव्या बाजूला ठेवत पुढे-पुढे जात राहिले कि जिथे तटबंदी आत जात-जात जिकडे मिळते त्याठिकाणाहून एक पाण्याचा मार्ग खाली येतो. हाच तो वर जायचा मार्ग. सर्वात वरती मिळालेली तटबंदी तुटलेली आहे. तिच्याकडे लक्ष्य ठेवत चढले म्हणजे रस्ता चुकायचा प्रश्नच नसतो. अर्थात खालच्या टप्यात बरीच झाडी असल्याने आपल्याला आपले डोंगरी कौशल्य वापरावे लागते पण पाण्याच्या वाटेवरून उलट वर जात राहिलो तर फारसा त्रास पडत नाही. आम्ही सुद्धा गप्पा टाकत टाकत वर चढत होतो. झाडीच्या शेवटच्या टप्यामधून वर जाता-जाता जरा वाट चुकलोच. इतक्यात खाली उतरणाऱ्या २ जणांनी डाव्या बाजूने चांगली वाट आहे असे सांगितले. ज्यावाटेने जात होतो तिकडून अजून पुढे गेलो असतो तर नक्कीच 'पोचलो असतो' किंवा किमान 'वाट तरी लागली' असतीच. इकडे अनुजाने एक गोल मारलाच. नशीब फारसे काही लागले नाही. थोडेसे खाली सरकलो आणि डाव्या बाजूने वर जायला लागलो. सागरचा हा पहिलाच ट्रेक होता पण पठ्या सर्वात पुढे होता. कधी एकदा वर पोचतोय असे झाले होते. त्या मागोमाग दीपक आणि अनुजा होते. मी, सुहास आणि भारत सर्वात मागे होतो. झाडी मधून वर पोचल्यावर जरा दम घेतला. मागे पवना धरणाच्या पार्श्वभूमीवर लोहगड साद घालत होता. सर्वत्र हिरवळ होती... पाऊस मात्र आज रुसला होता. एक टिपूर सुद्धा पडले नव्हते. आम्ही पावसाने नाही तर घामाने भिजलो होतो. वर पोचायला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागला होता. अवघ्या तासाभरात आम्ही माथ्यावर होतो. समोरून झिरपणाऱ्या थंडगार पाण्याने ताजेतवाने झालो आणि ५ मिनिटे निवांत बसून गडफेरीला सज्ज झालो.
चढणीच्या मधल्या टप्यामधून दिसणारा लोहगड...
तिकडून थेट डावीकडे निघालो आणि तटबंदीच्या फांजी वरून चालत-चालत लोहगडच्या दिशेने टोकाला निघालो. तटबंदी संपली तसे खाली मातीत उतरलो. वाटेत जमीन सर्वत्र मऊ-मऊ झाली होती. मध्येच खेकडे पळायचे तर मध्येच सोबत असलेले कुत्रे. जरा कुठे पाण्याचे डबके दिसले की जाऊन मस्त डुंबायचे. बाहेर येऊन गवताला अंग पुसत लोळायचे. आपल्याला सुद्धा असे करता येईल का असा मनात विचार यायच्या मध्येच. पण नंतर लक्ष्यात यायचे आपण आता तितके फ्लेक्सिबल राहिलेलो नाही... :) विसापूरच्या टोकाला पोचलो. लोहगड आणि त्याचा विंचूकाटा दिसत होता. त्यावरून चालणारी बारीक माणसे देखील दिसत होती. भाजे लेणी आणि त्याबाजूने वर येणारी जत्रा देखील दिसत होती. थोडीशी पेटपूजा केली आणि गडाच्या उत्तर दिशेला निघालो. ह्या ठिकाणी १००-२०० मीटर तटबंदी उत्कृष्ट स्थितीमध्ये आहे. बुरुज, जंग्या आणि फांजी सर्व एकदम अस्सल मराठी बांधकाम. बाकीची पूर्ण तटबंदी इंग्रजांनी १८१८ मध्ये पडून टाकली आहे. विसापूर पडला तसा २ दिवसात लोहगड सुद्धा इंग्रजांना विशेष प्रयास न करता मिळाला. बरोबर मध्यभागी एक मोठा चुन्याचा घाणा आहे. तटबंदी उभी करताना वापरला गेलेला...
चुन्याचा घाणा ...
तसेच तटबंदी वरून पुढे जात होतो इतक्यात एका माकडाने आम्हाला हूल दिली. हल्ला नव्हता पण नुसतीच हूल दिली. नशीब आमच्या सोबत कुत्रे होते. त्यांनी लगेच माकडावर प्रतिहल्ला करून त्याला तटबंदीवर रोखून धरले. इतक्या वेळात मी तटबंदी वरून खाली उडी मारून सुरक्षित जागी पोचलो होतो. माझ्या हातातले छायाचित्रण करण्याचे यंत्र न जाणो त्याने खाद्ययंत्र समजून खेचले असते तर... तिकडून सरळ तटबंदी सोडून गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पायथ्याकडे निघालो. या ठिकाणी मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आहे. दोन्ही बाजूला पाण्याची टाक आहेत. नेमका शनिवार होता. दर्शन घेतले आणि मनोमन 'जय हनुमान' म्हणत पुढे निघालो.
मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आणि पाण्यामध्ये मूर्तीचे प्रतिबिंब...
पूर्व दिशेने पुन्हा दक्षिण दिशेकडे पोचत गड प्रदक्षिणा पूर्ण केली आणि जिकडून वर चढून आलो होतो तिकडे येऊन निवांत बसलो. छान वारा सुटला होता. आसपास गाई-गुरे चरत होती. सोबत आलेली २ कुत्री लोळत बागडत होती. कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते. जे काही भवताली आसमंतात होते ते सर्वकाही डोळ्यात साठवून घेत होते. समोर बुलंद लोहगड उभा होता. पलीकडे मागे पवनाच्या प्राश्वभूमीवर तुंग-तिकोना उभे होते. पुन्हा एकदा एक नजर ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले. पुन्हा इकडे कधी येईन काय माहित!!!
२ वाजले होते. आल्या वाटेने उतरायला सुरवात केली. अवघ्या २० मिनिटात आम्ही खाली लालमातीच्या वाटेला लागलेलो होतो. आणि तिकडून काही मिनिटात पुन्हा वाडी मध्ये पोचलो. ट्रेकची सांगता झाली होती. एक छोटासा मात्र अतिशय आनंद देणारा ट्रेक पूर्ण करून आम्ही भरून पावलो होतो. असे अजून ट्रेक्स व्हायला हवेत असे सर्वांचेच मत होते. वाडीमध्ये बाळूकडे झुळका-भाकर आणि अंडाकरीची ऑर्डर दिली आणि पुन्हा एकदा गप्पा टाकत बसलो. जेवण झाले तसे परतीच्या वाटेला लागलो. लोणावळ्यामध्ये पुरोहित चिक्कीला थांबलो आणि सर्वांनी चिक्की घेतल्या. दिपकने मात्र घरी कोणीच नाही म्हणून चिक्की घेतली नाही. अनुजाच्या मते मात्र 'घरी नाहीत तरी गाडीत लोक आहेत तेंव्हा दीपकने सुद्धा चिक्की घ्यायला हवी होती' असे होते. त्यावरून त्याला थोडे पिडले. भारत लोणावळ्यावरूनच पुण्याला परत गेला आणि आम्ही मुंबईच्या दिशेने गाडी मारली. मावळातला पवनाकाठचा विसापूर हळूहळू मागे पडत गेला... राहिला आता फक्त आठवणीमध्ये... पुन्हा त्याला भेटायला जाईपर्यंत...
Photos sahi aahet re....Aani post pan....!!! Pudhachya weli mi nakki yenare...lawakarat lawakar tharav kahitari...!!! :)
ReplyDeleteनेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन....फोटु पण भारी आहेत.
ReplyDeleteमस्तच रे रोहणा.... मी मिस केले नेमके... :(
ReplyDeleteअसो पुढच्या वेळेस मात्र नक्की येणार तुमच्याबरोबर....
वर्णन आणि फोटोज भन्नाट एकदम... :)
सॉलीड आहे भाऊ! जबराट वाटतंय वर्णन ऐकूनच. मस्त फील आला. फोटो बघून तर लगेच तिकडे जावं की काय असं वाटतंय. ट्रेक करत रहा. शुभेच्छा!
ReplyDeletevarnan surekh ahe, killa agadi dolyasamor ubha rahato.
ReplyDeleteरोहन फ़ारच छान झालीय रे पोस्ट..मागे लोहगड केला तेव्हा विसापूर लिस्टवर असून राहिला कारण लोहगडच्या विंचुकाट्यावरच आमच्यातल्या एकाने टी.पी. केला होता. असो..पण आता वाटतं की हे वाचून नंतर गडावर गेलं तर जरा परीपूर्ण भटकंती करता येईल...खरंय तुझं असे ट्रेक केले पाहिजेत. तू हा ट्रेक आयोजित करुन पुर्णत्वाला नेल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन....पाहुया आता तुझ्याबरोबर भटकंतीचा योग कधी येतोय ते....
ReplyDeleteरोहणा, जबरीच रे. फोटो आणि वर्णन दोन्हीही इतके टेम्प्टींग आहेत नं की आता कधी एकदा आपण ट्रेक करतोय असे झालेय. :)
ReplyDeleteफोटो मस्त आहेत, ताजातवाना झालो पोस्ट आणि फोटो पाहून
ReplyDeleteजुन्या आठवणी ताज्या झल्या विसपूरच्या वर्णनाने आणि सोबतच्या छान छायाचित्रांमुळे. मजा आली वाचून.
ReplyDeleteमस्त वर्णन केलंयस रे भाऊ....लय भारी..
ReplyDeleteतुझ्याबरोबर एकदा ट्रेकचं जमवायचंच आहे!
मस्तच झाली रे ट्रेक...वर्णनही छान..मी खरच मिस केल यार हे सगळ...
ReplyDeleteअरे, ती अजुनही पीडतेय मला... तिला शांत करायला काल सुधागडला जाताना वाटेत एक छोटं पॅकेट घेतलं होतं पण पुरोहितांचीच चिक्कीची डिमांड अजुन कायम आहे आणि ती सुद्धा अगदी टनभर...काल सुधागडला जाउन आलो आम्ही. भारीच ट्रेक झाला, एकदम थ्रीलर!!!
ReplyDeleteबाकी, पोस्ट भन्नाट, सगळा ट्रेक अगदी डोळ्यासमोर आला...
सेनापती तुमच्या मुळेच मला ह्या ट्रेक चा अनुभव घेता आला आणि माझा पहिला ट्रेक एकदम भन्नाट झाला....बाकी पोस्ट एकदम झक्कास झाली आहे पुन्हा त्या वातावरणात घेऊन जाते..पावसाळा संपायच्या आत पुन्हा एक ट्रेक तुमच्या सोबत करायची इच्छा आहे.....जमलं तर लवकरात लवकर पुढचा ट्रेक ठरावा...
ReplyDeleteMast aahe dada photos pan chan aahet
ReplyDeleteवाह रोहन, सगळा ट्रेक असाच्या असा मांडलास रे..तुझ्यामुळेच हे शक्य झाला. परत भेटूच, जिवात जीव असे पर्यंत ह्या सह्याद्रीच्या डोंगरकपार्या फिरत..
ReplyDeleteजय शिवाजी
Great ! Great Post Cool Pics. Wish to be there sometime.
ReplyDeleteमस्त पोस्ट झाली आहे. अरे तो गोल केला खर पण त्याच्या खुणा अजून हातावर घेऊन फिरतेय , आणि त्या चिक्की बद्दल बोलयचे झाले तर देपाकाला खुपः जास्त पिडला रे शेवटी आला घेऊ चिक्की पण ती तर माझ्या पोटापर्यंत पण पोचली ;-)
ReplyDelete